रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया
ग्रामीण भागात उद्योग उभारले जावे. नवे उद्योजक पुढे यावेत. त्यांच्या संकल्पना साकार व्हाव्यात. मार्केटिंग, तंत्रज्ञान निर्यात याची माहिती मिळावी. स्वयंरोजगार निर्मिती, शासकीय योजना, कर्ज उभारणी, संदर्भात माहितीचे आदान- प्रदान एकूणच उद्योग उभारणीचे सर्वंकष प्रयत्न व अडीअडचणी संदर्भातील एक सक्षम उद्योगपीठ.
रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया ही व्यवसाय मालकांची आणि उद्योजकांची संघटना आहे जी त्यांच्या स्थानिक व्यावसायिक समुदायाच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देते. चेंबर्स ऑफ कॉमर्स मौल्यवान संसाधने, सवलती आणि संबंधांमध्ये प्रवेश प्रदान करतात जे व्यवसायांना पैसे वाचविण्यास आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यास मदत करतात .सध्याच्या परिस्थितीतील नोकरीमध्ये असणारा तुटवडा व नोकरी असली, पगार जरी जास्त असतात तरी असलेली महागाई यामुळे आजचा तरुण हा उद्योगांकडे वळत आहे. परंतु तरुणांना, खास करून खेड्यातील तरुणांना उद्योगाचा प्लॅटफॉर्म नसल्यामुळे पूर्वानुभव नसल्यामुळे बरेचसे अडचणी येतात मार्गदर्शन नसते योग्य दिशा नसते त्याकरताच रुरल चेंबर्स ऑफ कॉमर्स ची स्थापना झालेली असून खेड्या खेड्यातील उद्योजकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे व व्यवसायामध्ये पुढे जाण्याचे धडे या संस्थेमार्फत दिले जातात तसेच पूर्ण देशभरातील व्यावसायिकांना एका साखळीत आणून या व्यावसायिक साखळीच्या माध्यमातून खेड्या खेड्यातील लहान लहान उद्योगांना मोठे कशे करता येईल याच्या वर रुरल चेम्बर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया काम करते आहे.