connect@rccindia.org +91 9860250828

प्रस्तावना

प्राचीन भारताचा इतिहास त्याच्या ग्रामीण भागातील समृद्धीजी खोलवर गुंफलेला आहे. आपली गावे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती, जगाच्या उत्पादनामध्ये भारताचे जवळपास २३% योगदान होते. ग्रामीण समुदाय स्वावलंबी, चैतम्यशील आणि आर्थिक कामकाजांनी भरभराट करणारे होते. ग्रामीण लोकशक्तीने व्यवसायांचे एक मजबूत जाळे तयार केले होते ज्याने संपूर्ण देशाला भरभराट आणि आर्थिक समृद्धी दिली होती.

ग्रामीण भागाची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आज केवळ २% उद्योग ग्रामीण भागात उरले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या शोधात देशाचा तरुण वर्ग शहरी भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असल्यामुळे २०५० पर्यंत ग्रामीण भाग फक्त २५ टक्के शिल्लक राहील असे अनुमान आहे. या स्थलांतरामुळे ग्रामीण आर्थिक संसाधने नष्ट होत आहेत व ग्रामीण भाग व्यवसाय व आर्थिक संधी पासून वंचित राहत आहे. अशा परिस्थितीमुळे झालेला बदल आपल्या ग्रामीण समुदायांच्या सामाजिक-आर्थिक रचनेला केवळ धोका निर्माण करत नाही तर शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण आव्हाने देखील निर्माण करतो.

या आव्हानांना प्रतिसाद म्हणून, ग्रामीण भारताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी रूरल चैंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया समर्पित आहे. ग्रामीण भागाला भरभराटीच्या व्यवसाय केंद्रात रूपांतरित करणे व स्थानिक उद्योगांना देशभरातील ग्राहकांसोबत जोडणे हे आमचे ध्येय आहे. उद्योग, उत्पादन केंद्रे आणि ग्राहकांना जोडून एक संयुक्त बाजारपेठ निर्माण करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचे व विकासासाठी शाश्वत संधी निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.

हा दृष्टकोन साध्य करण्यासाठी, ग्रामीण उद्योजकांना नावीन्यपूर्ण कौशल्य देण्यासाठी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग धोरण, आयात निर्यात, स्थानिक बाजारपेठ विषयावर उद्योजकांना व तरुणांसाठी चर्चासत्र तसेच प्रशिक्षण शाका आयोजित करणे, कमीत कमी गुंतवणुकीसह व्यवसाय सुरू करण्याच्या संधी प्रदान करणे, ग्रामीण व्यवसायांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम करून बाजारपेठ, वित्त आणि तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्यासाठी विविध मार्ग रूरल चैंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच ग्रामीण उत्पादकांना थेट विक्रेत्यांशी जोडण्यासाठी आम्ही मजबूत जाळे तयार करत आहोत, ज्यामुळे वाजवी दर सुनिश्चित होतील आणि मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होईल. सोबतच विविध संसाधने पुरवून, आम्ही ग्रामीण व्यक्तीना स्वयंविक्रेते होण्यासाठी सक्षम करत आहोत, त्याद्वारे उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देत आहोत आणि ग्रामीण संदर्भाला अनुकूल बाजारपेठ धोरणांना प्रोत्साहन देत आहोत जेणेकरून ग्रामीण व्यवसायांना व्यापक बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल.

ग्रामीण भागात नवचैतन्य, सहयोग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी आश्वासक परिसंस्था निर्माण करणे तसेच सरकारी संस्था, आर्थिक संस्था आणि इतर भामधारकांसोबत मजबूत भागीदारी निर्माण करून, ग्रामीण व्यवसायांच्या भरभराटीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.

एकत्रितपणे, आपण असे भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत जिथे ग्रामीण भारत पुन्हा एकदा आर्थिक ताकदीचा आधारस्तंभ म्हणून उभा राहील व संपूर्ण राष्ट्रसाठी समृद्धी आणि मवकल्पनेवा स्त्रोत म्हणून पुढे येईल. बदलत्या परिस्थितीमध्ये आपली गावे व आपली संस्कृती नष्टन होता आधुनिक अर्थव्यवस्थेत त्यांची Act भरभराट होत राहील याची खात्री करून ही दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया कटिबद्ध आहे.

रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया